Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रविंद्र चव्हाण विक्रमी मतधिक्क्याने विजयी होणार

 रविंद्र चव्हाण विक्रमी मतधिक्क्याने विजयी होणार 

   - महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा ठाम विश्वास 


ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण  वार्ताहर

आजपर्यंतचा झालेल्या  2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यास दरवेळेस रविंद्र चव्हाण यांच्या मतांमध्ये वाढ झाली असून यंदाच्या निवडणुकीत ते विक्रमी मताधिक्क्याने विजयी होतील असा ठाम विश्वास महायुतीच्या डोंबिवलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत झालेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पत्रकार परिषदेत हा विश्वास व्यक्त करण्यात आला. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय समीकरणे बदलली. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे भाजप शिवसेना युती सरकारने सुरू केलेली अनेक विकासकामे रखडल्याचा आरोपही या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. मात्र अडीच वर्षांपूर्वी राज्यात स्थापन झालेल्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने पुन्हा एकदा इथल्या विकासकामांना गती दिली. आणि परिणामस्वरूप गेल्या काही महिन्यांमध्ये डोंबिवलीमध्ये अनेक महत्त्वाची विकासकामे वेगाने सुरू झाली आहेत. ज्यामध्ये डोंबिवलीतील सर्व डांबरी रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचे काम सुरू असून येत्या काही महिन्यात डोंबिवलीकरांना सुसज्ज आणि चांगले रस्ते मिळतील असा विश्वास यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

यावेळी भाजपचे शशिकांत कांबळे, राहुल दामले, मंदार हळबे, शिवसेनेचे राजेश कदम, राजेश मोरे, संतोष चव्हाण यांच्यासह डोंबिवलीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments