काव्य किरण मंडळाचा अभिजात मराठी भाषा या विषयावर मासिक साहित्यिक मेळावा संपन्न...
ब्लॅक अँड व्हाईट /कल्याण वार्ताहर
काव्य किरण मंडळ, कल्याण या मंडळाचा मासिक कवी संमेलन शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर,२०२४ रोजी सायंकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत कल्याण येथील लोक मंगलम् संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाले दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रशानाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ केला. या निमित्ताने काव्य किरण मंडळाच्या सदस्यांचा अभिजात मराठी भाषा या विषयावर स्वरचित कविता वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे व निमंत्रित कवी म्हणून प्रसिद्ध सूत्रसंचालक व साहित्यिक गोपाळ वेखंडे (मुरबाड) उपस्थित होते. मंडळाच्या कार्याध्यक्षा कवयित्री स्वाती नातू व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. तर मंडळाचे कोषाध्यक्ष सतीश केतकर यांनी गोपाळ वेखंडे यांचे यथोचित स्वागत केले. याप्रसंगी निमंत्रित कवी गोपाळ वेखंडे यांनी काळानुसार बदलत गेलेल्या मराठी भाषेचे स्वरूप यावर भाष्य केले तसेच सामाजिक, पाऊस अशा विषयांवरील आशयघन कविता सादर केल्या.
यानंतर मंडळाच्या उपस्थित सभासदांनी "अभिजात मराठी भाषा' या विषयावरील एकापेक्षा एक अशा सरस व उत्तम उत्तम स्वरचित कवितांचे सुंदर वाचन व गायन केले. त्यात मंडळाच्या अध्यक्षा कवयित्री दया घोंगे, मंडळाच्या कार्याध्यक्षा कवयित्री स्वाती केतकर नातू, मंडळाचे कोषाध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी सतीश केतकर, मंडळाचे सचिव तथा प्रसिध्द व्याख्याते व कवी शारदासुत सुनील म्हसकर, कवी व मनोज केळकर, कवी कैलास बडगुजर, कवयित्री प्राजक्ता कुलकर्णी, कवयित्री मंजिरी पैठणकर, जोत्सना करमरकर ,लोक मंगलम् संस्थेचे संदीप कुलकर्णी यांनी वैविध्यपूर्ण रचना सादर केल्या. सदर साहित्यिक मेळाव्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती नातू यांनी केले.
.jpg)

Post a Comment
0 Comments