Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बिल्डरच्या अन्याया विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी धडक मोर्चा

 बिल्डरच्या अन्याया विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी 

         धडक मोर्चा

                   ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

 हेदुटणे परिसर पलावा सिटी म्हणून बराच विकसीत झाला मात्र  परिसरातील भूमिपुत्र शेतकऱ्याच्या जमीनी विकत घ्यायच्या आणि त्यांना त्यांचा मोबदला न देता गरीब गरजु  शेतकऱ्यावर अन्याय करायचा असा काहीसा प्रकार मोठ्या प्रमाणावर उघड होताना दिसत आहे. बौद्ध समाजातील मंगेश जाधव यांनी लोढा बिल्डर यांस स्वताची जागा विकसीत करण्यासाठी दिली होती. 
मंगेश जाधव हे त्यांचा हिस्सा मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता, त्यांनी मंगेश जाधव यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा खोटा गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास केल्यानंतर या गुन्ह्यात मंगेश जाधव यांचा काहीही संबंध नाही असा निष्कर्ष काढला. 
त्यामुळे बिल्डरने मंगेश जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे हे सिद्ध झाले आहे. अनुसूचित जातीच्या सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देणे म्हणजे अनुसूचित जाती जमाती (अन्याय अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे अट्रोसिटी  कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी मंगेश जाधव यांनी समाजाला सोबत घेऊन आज अप्पर पोलीस आयुक्त ,कल्याण  येथे धडक मोर्चा काढून विकासका विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Post a Comment

0 Comments