महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी रविश तांडेल यांची नियुक्ती
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच वासुंद्री गावाचे माजी सरपंच रविश तांडेल यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पत्र सरपंच सघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा राजेंद्र कराळे यांनी दिले आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे, संघटक अँड. देवा पाचभाई उपस्थित होते.
रविश तांडेल हे वासुंद्री ग्रामपंचायतचे सरपंच आसतांना विविध योजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना दर महिन्याला मानधन देण्यात यावा यासाठी शासन दरबारी सन 2018 पासून पाठपुरावा सुरू आहे. लोकसंख्या नुसार आता सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना मानधन मिळणार असुनं शासनाने मंजुरी दिली आहे.
यावेळी सरपंच संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष रविश तांडेल यांनी सांगितले की, माझ्या सरपंच कारकिर्दीतील कामाची दखल घेऊन संघटनेच्या वतीने कोकण प्रदेश अध्यक्षपदी निवड केली आहे. गेल्या सातवर्षांपासून शासनाकडे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना मानधन मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. शासनाने मान्य केले आहे. तसेच आता सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना बस मध्ये मोफत सवलत देण्यात यावी. टोल नाका फ्री पास देणे, मंत्रालयातील पास तसेच रेल्वेत प्रवास करताना पन्नास टक्के सवलत देण्यात यावी यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असे सांगितले.
.jpg)
Post a Comment
0 Comments