बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपी संचालकांना न्यायलयाने एका प्रकरणात दिला जामीन तर दुसऱ्या प्रकरणात पोलीस कोठडी
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
बदलापूर मधील शाळेत शिकणाऱ्या दोघा चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दडपणारे फरारी शाळेचे संचालक तुषार आपटे व उदय कोतवाल या दोघा आरोपींना ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक करून कल्याण न्यायलाया समोर हजार केले असता न्यायालयाने दोघा आरोपींना एका गुन्ह्यात जामीन दिला तर दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी सुनावली.
बदलापूर मधील दोघा चिमुरडीवर नराधम अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. या घटनेची माहिती असूनही तुषार आपटे व उदय कोतवाल या दोघा शाळेच्या संचालकांनी दडवून ठेवत्याची माहिती उजेडात येताच दोघा संचालकानी पळ काढीत गेल्या दीड महिन्या पासून फरार झाले होते. दरम्यान या दोघा फरार संचालकांनी न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता न्यायलयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. या दोघा फरार आरोपीचा पोलीस कसून तपास करीत होते अखेरीस ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बुधवारी रात्री दोघा फरार संचालक आरोपींना अटक करीत गुरुवारी दुपारी कल्याण न्यायालया समोर हजार केले.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयात, गुन्हे शाखेने सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांच्यामार्फत दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. पाटील यांनी युक्तिवाद केला की, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना कळल्यानंतरही शाळेचे अध्यक्ष व सचिवांनी पोलिसांना माहिती दिली नाही. घटनेच्या दिवशी शाळेतील सीसीटीव्ही बंद होते आणि याचा तपास करण्यासाठी त्यांनी आरोपींची चौकशी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणात दाखल झालेला जामीनपात्र पॉक्सो कायद्याचा गुन्हा आणि तत्सम इतर अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने दिलेल्या जामीनाचा दाखला देत न्यायाधीशांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला, तो न्यायाधीशांनी मंजूर केला. यानंतर गुन्हे शाखेने याच गुन्ह्यात दुसऱ्या पीडितेच्या एफआयआरमध्ये कोठडीची मागणी केली. न्यायाधीशांनी ही विनंती मान्य केली आणि नंतर शाखेने कोतवाल आणि आपटे या दोघांनाही त्या दुसऱ्या प्रकरणात अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांनाही पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी केले.
आरोपींचे वकील संजयकुमार धनके यांनी प्रसिद्धी माध्यामा समोरे जाताना एका प्रकरणात जमीन मंजूर झाला असून दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी ताबा घेतला असून उद्या कोर्टात त्या संदर्भात हजर केले जाणार असल्याचे सांगितले.
.jpg)


Post a Comment
0 Comments