Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सेवा सदन बी.एड कॉलेज, उल्हासनगर येथे मानसिक आरोग्य जनजागृती शिबीर संपन्न

 सेवा सदन बी.एड कॉलेज,        उल्हासनगर येथे मानसिक आरोग्य जनजागृती शिबीर संपन्न 


             ब्लॅक अँड व्हाईट/उल्हासनगर वार्ताहर 

10 ऑक्टोबर 2024 रोजी सेवा सदन बी.एड कॉलेज, उल्हासनगर येथे मानसिक आरोग्य जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करुणा किथाणी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला होता. करुणा या पार्थ सारथी क्लिनिकच्या संस्थापक आहेत. या सत्रात करुणा यांनी या विषयावर चर्चात्मक संवाद साधत  मानसिक आरोग्याचे महत्त्व, त्याचे फायदे आणि मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, मदत कधी घ्यावी, कोणाची मदत घ्यावी आणि मदत कोठे घ्यावी यासारख्या विषयांवर तपशीलवार माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी करुणा किथाणी म्हणाल्या, 'मानसिक आरोग्य हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा मदत घ्यावी. या सत्रात बीएड कॉलेजचे प्रशिक्षणार्थी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments