कल्याण पूर्वेत प्रथमच भव्य नमन रास गरब्याचे आयोजन
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेत नवरात्र उत्सवानिमित्त " नमन रास गरबा" या संस्कृतिक महोत्सवाचे आयोजन साईकृपा नवरात्रोत्सव चैरिटेबल ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व निलेश शिंदे फाउंडेशन , साईराज ग्रुप बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्या विद्यमाने भव्य, दिव्य स्वरूपात करण्यात आले आहे.
साईकुपा नवरात्रोत्सव मंडळ गेली १६ वर्षे नवरात्र उत्सव साजरा करीत असून यंदाच्या वर्षी मुबंई, ठाणे, डोंबिवली शहरात साजरा करण्यात येणाऱ्या कॉर्पोरेट दर्जाचा नवरात्र उत्सव गरब्याचे कल्याणात प्रथमच भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. दिं ३ ते १२ आँक्टोबर असा रास गरब्याचा कार्यक्रम कल्याण पूर्वेतील साईबाबा नगर, काटेमानीवली याठिकाणी होणार आहे. यामध्ये स्त्री शक्तीचा जागर होत असताना दररोज या कार्यक्रमात सहभागी होणार्या महिलांना आकर्षिक बक्षिसे दिली जाणार आहेत. या उत्सवा माध्यमातून कल्याण पूर्वेतील तरूण मित्र मैत्रिनींना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा व एक मोठा सोहळा या ठिकाणी व्हावा या हेतुने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याठिकाणी कल्याण पुर्वेच्या पंचक्रोशीतील सर्व ग्राम देवतांची पुजा केली जाईल.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदि, नरेश म्हस्के, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, यांच्यासह सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, गायक अभिजीत कोसंबी, प्रतिक सोळशे, अंशिका चोणकर यांची आकर्षक उपस्थिती राहणार आहेत. तर अजय अतुल यांच्या लाडक्या कलाकारांचा बॅड असणार आहे.
याकार्यक्रमा निमित्ताने 32 हजार चौरस मीटरचा भव्य मंडपात एकच वेळेस ६ हजार जणांना गरबा खेळता येईल अशी व्यवस्था केली आहे. नमन रास गराब्याचे आयोजन करत असताना पावसामुळे गरबा थांबणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पाणी व्यवस्था , फूड कोर्ट, अँब्युलन्स डॉक्टर ,दोन स्वतंत्र पार्किंग, स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा अशी व्यवस्था या सोहळ्यात करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख नीलेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख अरुण आशान,शिवसेना संपर्कप्रमुख प्रशांत काळे, शिवसेना उत्तर भारतीय विभाग शहरप्रमुख सी. पी. मिश्रा, साईराज ग्रुप चे संचालक संतोष सावंत, उपशहरप्रमुख जितेंद्र शिर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments