एसएसटी महाविद्यालयाची
विजयी घोडदौड
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ६ गोल्ड, ३ सिल्वर,
२ ब्राँझ मेडल्सची कमाई
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आरकेटी महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाने आपल्या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्पर्धेत वर्चस्व राखले. या स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाने एकूण ६ गोल्ड, ३ सिल्वर आणि २ ब्राँझ पदकांची कमाई करत जिल्हास्तरीय बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटवला.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात इमरान जहांगीरदार, चंदन चव्हाण, आणि माणिक राठोड यांनी अप्रतिम खेळ करत सुवर्ण पदक मिळवले. त्यांच्या मेहनतीला आणि कौशल्याला न्याय मिळवत त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. दुर्वेश जाधवने चुरशीच्या लढतीत सिल्वर मेडल पटकावले, तर आदर्श गुप्ताने ब्राँझ मेडलची कमाई केली.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटात आराधना यादव, प्राची सोनवणे, आणि अंकिता गौड यांनी गोल्ड मेडल जिंकत मैदानावर आपली जिद्द आणि कौशल्य सिद्ध केली. शिबा शेख आणि सरूर रजक यांनी सिल्वर मेडल जिंकत आपल्या मेहनतीला फळ मिळवले, तर सानिका वाडकरने ब्राँझ मेडल जिंकत आपल्या नावावर पदकाची नोंद केली.
महाविद्यालयाच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांचा उत्साह द्विगुणित झाला असून, त्यांच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा गौरव करण्यात येत आहे. एसएसटी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याने जिल्हा पातळीवरील बॉक्सिंग क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments