बीएसयूपीची'घरे धुळखात पडली ती केडीएमसी कोणाला देणार
ब्लॅक अँड व्हाईट बापू वैद्य: डोंबिवली
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात झोपडपट्ट्याचा विकास झालेला नाही.महापालिकेच्या क्षेत्रातील झोपडपट्टी राहणा-या नागरिकांना त्यांना हक्काची मिळविण्यासाठी बीएसयुपीच्या माध्यमातून अनेक टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या आहेत.या योजना अंतर्गत सुमारे बांधलेली सुमारे सहा हजारांहून जास्त घरें उपलब्ध असूनही त्यांचे वाटप का करण्यात येत नाही असा सवाल विचारण्यासाठी ही घरे गोरगरीबांना कधी देणार हा जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष माणिक उघडे यांच्या नेतृत्वाखाली केडीएमसी कार्यालयावर नुकताच मोर्चा काढण्यात आला काढण्यात आला होता.
बीएसयुपी ची घरें उपलब्ध असूनही वाटप न केल्याने त्या तयार घरांची दैन्यावस्था झाली असून त्या सदनिकांचा दुरुपयोग होत असून त्याची मोडतोड झाली आहे.प्रसाधन गृहांन घरातल्यांना दारे खिडक्या चोरीला गेल्याची घटना अनेक वेळा प्रसिद्ध झाली असली तरी महापालिका प्रशासनाला जाग येते नाही असे माणिक उघडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.आता ही घरे जरी बाधित नागरिकांना दिली तरी ती दुरुस्त करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागेल असे ते म्हणाले.
महापालिकेच्या क्षेत्रात झोपडपट्ट्यांमध्ये असंख्य हजार नागरिक झोपडपट्टी राहतात.झोपडपट्यात राहत असलेल्या नागरिकांना महापालिका प्रशासनाकडून मुलभूत सोयी सुविधा पुरविल्या जात नाही.सदर मोर्चा मध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते अण्णासाहेब रोकडे,,दयाल बहादुरे आदि मान्यवर व झोपडपट्टी राहणारे झोपडवासी सहभागी झाले होते.
.jpg)

Post a Comment
0 Comments