केडीएमसी क्षेत्रातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची महिला काँग्रेसची मागणी
कल्याण महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांचे केडीएमसी आयुक्तांना निवेदन
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे अती तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना निवेदन दिले आहे.
कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आदी महापुरुषांचे पुतळे आहेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ६ ते ८ महिन्यांमध्ये पडून त्यांची विटंबना झाली आहे. अशा प्रकारच्या दुर्घटनेची कल्याण डोंबिवली मध्ये पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे अती तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे जेणे करून महापुरुषांची विटंबना होऊन लोकांच्या भावनांशी खेळ होणार नाही. तसेच याठिकाणी सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक देखील नेमावा जेणेकरून पुतळ्यांची सुरक्षा आणि निगा दोन्ही राखली जाईल अशी मागणी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments