Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय गतका स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला घवघवीत यश

पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय गतका स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला घवघवीत यश..!



          ब्लॅक अँड व्हाईट/उमेश जाधव कल्याण -:


 नुकतेच पंजाब-संगरूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची टीम सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये ११ वर्षाखालील मुली मध्ये  इंडिव्हिज्युअल फरिसोटी क्रीडा प्रकारामध्ये कु. रिदिशा भांडाळकर हीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सिंगल सोठी संघीक क्रीडा प्रकारांमध्ये मुलींमध्ये कु. राजनंदिनी गायकवाड 
 कु. सई शिंदे, कु. अन्वी भांडारकर या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. 

तर १७ वर्षाखालील मुला-मुलींमध्ये टीम डेमो यामध्ये मुलींनी तृतीय क्रमांक पटकावला असून, यामध्ये कु. स्नेहा सय्यद, कु. राजकन्या नवले, कु. तन्वी साबळे, कु. आकांशा कुलकर्णी, कु. वैशाली मोटे, कु. सर्वांनी मोरे, कु. आदिती सानप, कु. नम्रता देशपांडे, कु. नेहा जगताप, कु. संयुक्ता मिसाळ यांनी सहभाग घेतला होता.

टीम फरीसोटी या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असून या संघामध्ये श्रमिका पाटील, तन्मयी पाटील, सेजल गालींदे, भाग्यश्री बांगर यांनी सहभाग घेतला होता. तसेच २५ वर्षाखालील मुली मध्ये इंडिव्हिज्युअल सिंगल सोटी क्रीडा प्रकारांमध्ये जिज्ञासा पाटील हिने  द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच
२५ वर्षाखालील संघीक मुलींमध्ये संघाने तृतीय क्रमांक पटकावला यात मानसी पाटील, जिज्ञासा पाटील, प्रणाली कांबळे, कवीना बांडे यांनी सहभाग घेतला होता.

तर ३० वर्षाखालील मुलांमध्ये इंडिव्हिज्युअल फरिसोटी क्रीडा प्रकारांमध्ये अनिकेत टिके यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. ३० वर्षाखालील मुलींमध्ये इंडिव्हिज्युअल डेमो क्रीडा प्रकारांमध्ये अमृता होमकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला असून,३० वर्षाखालील मुलींमध्ये इंडिव्हिज्युअल सिंगल सोटी क्रीडा प्रकारामध्ये प्रगती महांगडे द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ३० वर्षाखालील मुलींमध्ये टीम फरीसोटी क्रीडा प्रकारांमध्ये संघाने प्रथम क्रमांक पटकावल असून यामध्ये वैष्णवी मानकर, काजल पाटील अमृता होमकर या मुली सहभागी झाल्या होत्या. 

या स्पर्धेतसाठी महाराष्ट्रातील स्पर्धकांना असोसिएशन ऑफ गतका,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संतोष जयसिंग चौधरी आणि सचिव प्रा. आरती एकनाथ चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले होते. विजेत्या खेळाडूंना त्यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.  महाराष्ट्र संघाचे टीम कोच दलजीत सिंग, साक्षी चौधरी,  प्रा. स्वाती मॅगेरी, संतोष कवळे, पांढरकर, श्रीधर कांबळे, व टीम मॅनेजर रवी पवार यांनी उल्लेखनिय कामगिरी करत महाराष्ट्राला गतका स्पर्धेमध्ये यश संपादन करून दिले आहे. 

Post a Comment

0 Comments