Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कडोंमपाचे पत्रकारांसाठी घरकुल योजनाचे धोरण राबविण्यास टाळाटाळ?

 कडोंमपाचे पत्रकारांसाठी घरकुल योजनाचे धोरण राबविण्यास टाळाटाळ?

                ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली: प्रतिनिधी 

कडोंमपा क्षेत्रातील पत्रकारांनसाठी आर्थिक दृष्ट्या परवडणारी घरकुल योजना राबविण्यासाठी महापालिकेची सकारात्मक धोरण निश्चित करण्यासाठी टाळाटाळ.१३नोंव्हेबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांनी ठाणे महापालिकेने ज्या पद्धतीने ठाण्यातील पत्रकारांनसाठी घरकुल योजना राबविण्यात आली त्याप्रमाणे केडीएमसी क्षेत्रातील पत्रकारांनसाठी घरकुल योजना राबविण्यासाठी निर्देश दिले होते त्याला तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई युडी-२ ला लेखी कळविले होते त्याप्रमाणे नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी अनेक महापालिकेच्या क्षेत्रात घरकुल योजनेच्या संबंधात चर्चा करून आयुक्त केडीएमसी ला पाच ऑक्टोबर २३ला  आदेश देण्यात आला,त्यांत त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की,ठामपाने ज्याप्रमाणे घरकुल योजना अंमलात आणली त्यानुसार पण आर्थिक दृष्ट्या परवडणारी घरे केडीएमसी क्षेत्रातील पत्रकारांनसाठी घरकुल योजना राबविण्यासाठी सकारात्मक धोरण निश्चित करून ती राबविण्यात यावी.
पण खेदाची बाब आहे की आजपर्यंत आयुक्त  केडीएमसीने योजना राबविण्यासाठी सकारात्मक विचार केलेला नाही.पण मात्र पत्रकारांनचा विरोध असतानाही सदर योजना म्हाडा प्राधिकरणाडे योजना संबंधित पत्र वर्ग केले.वास्तविक नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या पत्रकाप्रमाणे धोरणात्कम निर्णय घेणे उचित होते. पण मात्र योजना राबविण्यासाठी एक कमिटी गठीत केली त्याची सुध्दा तीन चार महिन्यांत एक सभा झाली त्यानंतर आजूनही सभा घेतली नाही.म्हाडा प्राधिकरणाला कळविण्या आधी गठीत करण्यात आलेल्या कमिटीत चर्चा न करता म्हाडाला पत्र पाठवले.
वरील सर्व बाबींसंबंधी ज्येष्ठ पत्रकार व त्यांचे सहकारी पत्रकार व प्रेस असोसिएशन कल्याण डोंबिवली रजिस्टर केडीएमसी पासून मंत्रालयात नगरविकास विभाग पर्यंत सातत्याने पाठपुरावा करत आलो आहोत त्यामुळे घरकुल योजना राबविण्यासाठी केडीएमसी प्रशासनास सहकार्य करेल असे वाटत होते परंतु केडीएमसी प्रशासन शासनाने दिलेल्या आदेशानुसार योजनाची अमंलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत आहे ही पाठपुरावा करीत असलेल्या पत्रकार खेदाने म्हणत आहेत.
तरी मी बापू वैद्य व इतर सर्व पत्रकार यांच्या तर्फे केडीएमसी आयुक्त यांनी मागणी करत आहोत की नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई शासनाच्या आदेशाप्रमाणे विनाविलंब अंमलबजावणी करण्यासाठी सकारात्मक धोरण निश्चित करून राबविण्यात यावी.

Post a Comment

0 Comments