सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते.
कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलीस मदत केंद्राचा शुभारंभ
वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न.
रात्रीच्या प्रवासावेळी रेल्वे स्थानकावर किंवा स्थानकाच्या परिसरात एखादा गुन्हा घडला की प्रवाशांसमोर मोठा पेच निर्माण होतो. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आता महत्त्वाचे पाऊल उचलत कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत दोन पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना फायदा होणार असून गुन्ह्यांचे प्रमाण देखील कमी होणार आहे.
ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली वार्ताहर
सध्या गुन्ह्यांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महिलांची सुरक्षेचा प्रश्न असो किंवा रात्रीचा रेल्वे प्रवास.प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हे घडताना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात येत आहे. रात्रीचा प्रवास करताना प्रवाशांच्या मनात काही प्रमाणात भिती देखील निर्माण होते. या सर्व समस्या लक्षात घेऊन आता कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत दोन पोलीस मदत केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला आहे. वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि महिलांची सुरक्षा टिकून राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांची सुरक्षा आणि रेल्वे प्रवासात वाढलेले गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन प्रवाशांसाठी कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत दोन पोलीस मदत केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला आहे. आज रविवारी सकाळी ८ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिला पोलिसांनी मंत्री चव्हाण यांचे आभार मानले. या कार्यक्रमावेळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे उपस्थित होते.
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले की, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेने मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, लोहमार्ग पोलीस वरिष्ठ अधिकारी इत्यादींच्या उपस्थित कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत उभारण्यात आलेल्या दोन पोलीस मदत केंद्रांचा शुभारंभ पार पडला. महिलांची सुरक्षा आणि रेल्वे प्रवासात वाढलेले गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलं आहे.
ठाकुर्ली व कोपर दोन्ही स्थानकात पश्चिमेला मदत केंद्र ठेवण्यात आले असून अहोरात्र पोलीस त्या स्थानकात कार्यरत असतात. त्यामुळे या मदत केंद्राचा प्रवशांना नक्कीच फायदा होईल. पोलीस ऑनड्युटी असताना प्रवाशांना मदत केंद्राचा लाभ होईल. तसेच एखादी घटना घडल्यास प्रवाशांना पोलीस सहकार्य हवे असल्यास कुठे जावे याबाबत त्या कक्षातले पोलीस सहकार्य करतील असेही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितलं आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments