Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सिंधी समुदायाचा चालिया उत्सव संपन्न

 सिंधी समुदायाचा चालिया उत्सव संपन्न 

                   ब्लॅक अँड व्हाईट/उल्हासनगर वार्ताहर

उल्हासनगर कॅम्प 5 मधील पूज्य चालिया साहेब मंदिरात  चालीया उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला . यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,  सुमारे 50 हजार   भाविकांनी डोक्यावर मटके ठेवून जलदेवतेची पूजा केली आणि चालिया मंदिर येथील पाण्याच्या कुंडात व उल्हास नदीच्या पात्रात हे मडके अर्पण करण्यात आले .

                          चाळीस दिवसांचे व्रत

      चालिया उत्सवात सिंधी समाज चाळीस दिवस उपवास करतो आणि पूजेबरोबरच त्यांचे आराध्य दैवत झुलेलाल यांची मंदिरांमध्ये कथा, आरती, भजन-कीर्तन केले जाते त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात, यावेळी दिवे प्रज्वलित करून ते पाण्यात अर्पण करण्याची प्रथा आहे.  महिला दररोज घरातून चार-पाच तोंडी पिठाचा दिवा घेऊन भगवान झुलेलेलालची पूजा करतात आणि इच्छा मागणाऱ्या स्त्रिया घरातून तांदूळ, वेलची, मैत्र आणि लवंगा घेऊन येतात आणि एका भांड्यासह भगवान झुलेलालची पूजा करतात. बहराणा साहेबांचेही आयोजन केले जाते, हा व्रतवैकल्य जीवन सुखी होण्यासाठी आणि लोककल्याणासाठी साजरा केला जातो अशी सिंधी समाजाची मान्यता आहे.

                     मटकी विधीला महत्त्व

       महिलांच्या मटकी विधी मध्ये डोक्यावर मडके घेऊन हजारो महिलांनी ‘आयो लाल झुलेलाल’चा जयघोष करत भगवान झुलेलेलाल साईंच्या नावाने जयघोष केला, त्यानंतर त्यांनी जलदेवतेची पूजा करून मटके पाण्यात अर्पण केले जाते.  डोक्यावर मटके घेऊन लांबच लांब रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पुरुषांसाठी मटकी कार्यक्रम सुरू ठेवला जातो.देश विदेशातील सिंधी बांधव उत्सवासाठी उल्हासनगर मध्ये येतात.

         भगवान झुलेलालच्या या उत्सवात पाण्याची पूजा केली जाते, हा सिंधी समाजाचा सर्वात मोठा सण मानला जातो, यासाठी देश विदेशातून सिंधी बांधव उल्हासनगर मध्ये येतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान झुलेलाल वरुणदेवाच्या रूपात अवतार घेतात, चाळीस दिवसांची धार्मिक विधींनी त्यांचे सर्व दु:ख दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे .

        मंदिरात 76 वर्षांपासून सुरू आहे अखंड ज्योत

   चालिया मंदिरात 76 वर्षे अखंड ज्योत प्रज्वलित ठेवण्यात आली आहे,  ही ज्योत  पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या मंदिरातून आणली गेली आहे, हे व्रत धार्मिक पद्धतीमध्ये दीर्घकाळ चालणारे व्रत आणि सण असल्याचे मानले जाते.या मंदिरात जाऊन दोन वेळा प्रसाद घेण्याची परंपरा आजही हजारो भाविक पाळतात.

                   शिवसेनेच्या वतीने मोफत बस सेवा

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसेना उल्हासनगर शहर शाखेच्या माध्यमातून चालिया साहेब,  उत्सवासाठी  मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी उल्हासनगर-1 ते 5 पर्यंत मोफत बससेवा ठेवण्यात आली होती.

                 शहरातील राजकीय नेत्यांची उपस्थिती

       आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पू कलानी, टीओकेचे प्रमुख ओमी कलानी, माजी महापौर पंचम कलानी, भाजप नेते प्रदीप रामचंदानी, जमनू पुरस्वानी, राम परवानी, प्रकाश माखिजा, महेश सुखरामानी, मनोज सदनानी, विजय गेमनानी, आदी उपस्थित होते. पर्वणी, सेवेदारी सुनील दुसेजा, रॉकी शर्मा यांच्यासह अनेक राजकीय नेते मोठ्या संख्येने  उपस्थित होते. 



Post a Comment

0 Comments