Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कुमारी.राधिका वैद्य ठरली "मी अष्टपैलू " स्पर्धेची विजेती

               कु.राधिका वैद्य ठरली                          "मी अष्टपैलू " स्पर्धेची विजेती

डोंबिवलीतील मानस सायकॉलॉजीकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्ट आयोजित       " मी अष्टपैलू "सबसे काबिल कौन?     ४.० अनोखी स्पर्धा संपन्न.



                ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली प्रतिनिधी 

रविवार २२ सप्टेंबर रविवारी सकाळी ब्राह्मण सभा हॉलमधे मानस सायकॉलॉजीकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्ट आयोजित  " मी अष्टपैलू: सबसे काबिल कौन? ४.० ची अंतिम फेरी अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. गेली ४ वर्ष मानस व मनोदय तर्फे ही स्पर्धा मनोविकासाच्या दृष्टिकोनातून घेतली जाते.

 ७वी ते ९वीच्या विद्यार्थी गुगल फॉर्म भरून  या स्पर्धेत सहभागी होतात.सामाजिक,भावनिक,करिअर संबंधित प्रश्नांना त्यांना काही ओळीत उत्तरे द्यायची असतात,त्यांचे स्क्रिनिंग करून त्यातले काही पहिल्या फेरीसाठी निवडले जातात.पहिल्या फेरीत ८ पैकी ५ बुद्धिमत्तांवर आधारित लेखी प्रश्न विचारले जातात व ३ वर मानसचे कौंसेलर्स मुलाखत घेतात व त्यातून काही दुसऱ्या फेरीसाठी निवडले जातात.ही गटचर्चा फेरी असते, यात आयत्या वेळी विषय देऊन गटामधे परीक्षकांसमोर चर्चा केली जाते  व त्यावरून १० जण अंतिम फेरीसाठी निवडले जातात. यावर्षी ६० जणांनी गुगल फॉर्म भरले,त्यातून ४० जण पहिल्याफेरीत निवडले गेले,त्यातून २२ जण दुसऱ्या फेरीत होते. दुसऱ्या फेरीत विषय पुढील प्रमाणे होते,

  १) आपण आनंदी कसे रहावे.

 २) खेळात आपण कसे जिंकतो.

 ३) आर्थिक असमानता व आर्थिक  न्याय.

 ४) वेशभूषा  महत्वाची कि ज्ञान महत्वाचे.                      तर असे आधीच्या फेरीतून तावून सुलाखून निघालेले १० जण अंतिमफेरीत होते.





 पब्लिक राऊंड मध्ये सर्व उमेदवारांची मुलाखत घेतली गेली. व परीक्षकांनी पण त्यांना त्यांच्या सुरूवातीला भरलेल्या गुगल फॉर्म मधील सामाजिक,भावनिक मुद्द्यांवर जी उत्तरे दिली होती त्यावरून प्रश्न विचारले व नंतर प्रत्येकाने त्याच्या/तिच्या कलागुणांचे सादरीकरण केले, व त्यावरून विजेते निवडले गेले.

     सदर उपक्रमासाठी  लेखिका,निवेदिका,कलाकार वृंदा दाभोलकर, पुण्यातील प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ भूषण शुक्ल, के जे सोमैय्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व चित्रपटविषयक तज्ज्ञ प्रा अभिजीत देशपांडे हे मान्यवर परीक्षक म्हणून लाभले.

निकाल जाहीर करण्यापूर्वी परीक्षकांनी  मुले व पालक यांना मार्गदर्शन केले, व निकाल जाहीर केला.

उत्तेजनार्थ - ओमकार केंब्रिज शाळेची कु.साईशा बुक्का,

तिसरा क्रमांक -विद्या निकेतनचा मानस बेडेकर.

द्वितीय क्रमांक - विद्या निकेतनचाच अगस्त्य आठल्ये.

तर प्रथम क्रमांक आणि अष्टपैलू विजेती ठरली, टिळकनगर विद्या मंदिरची राधिका वैद्य.

 सर्व विजेत्यांना "अष्टपैलू " ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.

Post a Comment

0 Comments