ग्रामीण भागातील रस्त्यांकडे प्रशासनाचे अजूनही दुर्लक्ष का ?
ग्रामीण भागातील बाप्पांचे आगमन व विसर्जन
खड्डेमय रस्त्यातूनच झाले..!
आता दुर्गा मातेचे आगमन ही खड्डेमय रस्त्यातूनच होणार का?
ग्रामीण भागातील लोकांची ओरड..!
प्रशासनाचा मात्र कानाडोळा..!
ब्लॅक अँड व्हाईट/टिटवाळा उमेश जाधव
नुकतीच बाप्पांची स्वारी आली आणि गेली देखील. परंतू टिटवाळा ग्रामीण भागातील रस्त्यांची आवस्था इतकी दैनिय झाली आहे की, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता. अशी परिस्थिती सध्या सर्वत्र दिसून येत आहे.
यामुळे यंदाच्या गणपती बाप्पाची स्वारी खड्ड्यातूनच आली आणि गेली देखील. आणि काही दिवसांनी माता दुर्गा देवीचे आगमन होणार आहे. यामुळे भाविक भक्त व नागरीकांतून संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग प्रशासना विरूध्द नाराजीचा सुर निघत आहे.
मागील आठवड्यात गणेशोत्सव संपन्न झाला. आनंदाची व उत्साहाची उधळण करणारा हा सण. सध्या सर्वत्र याची लगबग
पहावयास मिळाली. मंडळांची मखर सजावट, घरगुती सजावट, सामानाची खरेदी विक्री अशा विविध कामांसाठी धावपळ करणारी मंडळी सगळीकडे दिसून आली. परंतू या सर्व धावपळीत प्रवास करतांना रस्त्यातील खड्ड्यांनी व रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे होणाऱ्या त्रासाने जिव कासाविसा होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत आहेत. टिटवाळा-फळेगांव रस्त्यावरील रूंदे गावालगतच्या काळू नदीवरील असणाऱ्या पुलावरील व लगतच्या रस्त्यावर असणारे खड्डे तसेच रूंदे गावातील नाक्यावरील अर्धवट रस्ता निर्मितीचा अपघात ग्रस्त खड्डा, पळसोली ते गेरसे पर्यंत रस्त्यावरील खड्डे, राया ते खडवली या रस्त्यावरील खड्ड्यांची अवस्था, कोलींब ते पोई रस्त्यावरील खड्डे, फळेगांव ते खडवली, रायता फाटा ते दहागांव, टिटवाळा-गुरवली पुला जवळील रस्त्यावरील खड्डे या ग्रामीणच्या मुख्य रस्त्यांची आवस्था खडेमय झाली आहे.
गणेशोत्सव संपला तरी खड्डे भरण्याची जाग प्रशासनाला आली नाही का? असा संतप्त सवाल नागरीकांतून केला जात आहे. या बाबीकडे स्थानिक लोकप्रतीनिधींचा देखील कानाडोळा होत असल्याचा आरोप नागरीकांतून करण्यात येत आहे. अशा या खड्डेमय रस्त्यांतून गणपती बाप्पा आले आणि गेले ही, आता नवरात्र उत्सव तोंडावर आला असून देवीचे देखील आगमन याच खड्डेमय रस्त्यातून होणार असल्याने नागरीकांतून प्रशासन व लोकप्रतिनिधीं विरूध्द संताप व्यक्त होत आहे.
गणरायाचे आगमन व विसर्जन झाले देखील, आता देवीचे आगमन जवळ आले आहे. प्रशासनाने खड्डे बुजण्याच काम केल नाही. या खड्डेमय रस्त्यातूनच आम्हाला देवीला आणावे लागेल काय? तसेच गेली कित्येक वर्षांपासून रूंदे येथे मुख्य रस्त्यावरील भला मोठा खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बुजविला जात नाही.
आनंद महाराज देसले, आंबिवली, नागरिक
आमच्या आख्यात येणारे सगळे खड्डेमय रस्ते नवरात्रा पूर्वी दुरूस्ती करण्यात येतील. सध्या खड्डे भरण्याचे काम सुरू आहे.
पोल, कार्यकार अभियंता, सा.बा. कल्याण
.jpg)



Post a Comment
0 Comments