Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख, राजेश मोरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. डोंबिवली.

 शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख, राजेश मोरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

                ब्लॅक अँड व्हाईट/डोंबिवली वार्ताहर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, डोंबिवली शहर शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात आणि डोंबिवली शिवसेना शहर शाखेत मोठ्या जल्लोषात साजरा झाला. या वाढदिवसानिमित्ताने राजेश मोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते मित्रमंडळी. सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला. मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी  दूरपर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी मोरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि आमदार होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

मोरे यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश पाठवला. याचे वाचन बापट यांनी केले शिवसेन डोंबिवली शहर शाखेतर्फे सन्मानपत्र देण्यात आले आणि त्याचे वाचन बापट यांनी केले.

Post a Comment

0 Comments