Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भिवंडीत एनसीबी कडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त

 भिवंडीत एनसीबी कडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त

                    ब्लॅक अँड व्हाईट/ठाणे वार्ताहर 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने ठाणे जिल्ह्यातील (Thane Drug) एक ड्रग्स सिंडिकेट उध्वस्त केले आहे. उल्हासनगर आणि भिवंडी या ठिकाणी एनसीबीने कारवाई करून ७५ किलो गांजा आणि ४ हजार ८०० कोडीन सिरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत.

या प्रकरणी ६ जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई तसेच आजूबाजूच्या शहरातील अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्यांवर आळा घालण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान एनसीबीने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि उल्हासनगर येथे कार्यरत असलेले आंतरराज्यीय सिंडिकेट उध्वस्त केले आहे. एनसीबीला मिळालेल्या गुप्तमाहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यानी या ड्रग्स सिंडिकेट एक भाग असलेल्या उल्हासनगर मधील एका कुरियर कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून ४ हजार ८०० कोडीन सिरपच्या बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत, या प्रकरणी विनोद पी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून विनोद पी या कोडीन सिरप ची डिलीव्हरी घेणार होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

विनोद पी (Vinod P) हा ड्रग्स सिंडिकेटचा एक भाग असून त्याच्या साथीदार मनीष पी (Manish P), आकाश पी (Akash P), राज के (Raj K), मोहनीश एस (Mohnish S) आणि सनी जे (Sunny J) या सहकाऱ्यांना भिवंडी परिसरातुन अटक करण्यात आली, त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता ट्रॅव्हल्स बॅग, ट्रॉली बॅग आणि गोणीत ७५ किलो गांजा आणि एक लाख १८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments