Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी क्षेत्रातील जाहिरात ठेकेदारांकडे ९ कोटींची थकबाकी

 केडीएमसी क्षेत्रातील जाहिरात ठेकेदारांकडे ९ कोटींची थकबाकी


त्वरित वसूली करण्याची मनसेची मागणी


                     ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक येथे होर्डिंग पडल्याची घटना घडल्यानंतर केडीएमसी क्षेत्रातील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून या जाहिरात ठेकेदारांकडे ९ कोटींची थकबाकी असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. थकबाकी असणारी हि ९ कोटी रक्कम त्वरित वसूल करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

२ ऑगस्ट रोजी सहजानंद चौक येथील मोठ्या होर्डिंगचा काही भाग पडून बऱ्याच गाड्यांचे नुकसान झाले. त्यात दोन नागरिक जखमी झाले परंतु तरी मालमत्ता विभाग यांनी कुठलाही बोध यामधून घेतलेला नाही असे दिसते. याबाबत राज्य सरकारचा जी.आर. आहे की, होडींगची साईज ४० बाय ३० फुट एवढीच असावी तसेच जमीनीपासून होर्डीग ही ४० फुटा पेक्षा उंच नसावी. राज्य सरकारच्या जी.आर.कडे दुर्लक्ष करून मालमत्ता विभाग अजुन त्यावर कुठलेही निर्देश पत्र काढत नाही.

माहिती अधिकार द्वारे मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार अधिकृत १५३ होर्डीगची एकूण थकबाकी ही ९ कोटींच्या जवळपास आहे. तर अनाधिकृत होर्डिंगची थकबाकी किती? यांची थकबाकी कोण वसूल करणार? असे प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो.  जर सर्व सामान्य नागरिकांनी त्यांच्या घरचा टॅक्स भरला नसेल, तर त्यांना दर महिन्या २ टक्के व्याज महापालिकेकडून बिलात लावला जातो. तर ह्या होर्डिंग ठेकेदारांना मुभा का दिली जाते असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

 त्यामुळे या जाहिरात ठेकेदारांकडून त्यांची थकबाकी लवकरात लवकर वसूल करावी व जमीनीपासून ४० फुटापेक्षा होर्डिंग जास्त उंच नसावे हे पत्र काढून कारवाई करावी.  तसेच या आठवड्यात कारवाई व थकबाकी वसूली न झाल्यास उपोषण तसेच आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. 


Tags

Post a Comment

0 Comments