Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एसएसटी महाविद्यालयाचे अंबरनाथ युवा मॅरेथॉनमध्ये वर्चस्व

                  एसएसटी महाविद्यालयाचे

             अंबरनाथ युवा मॅरेथॉनमध्ये वर्चस्व


               ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

अंबरनाथ येथे आयोजित युवा मॅरेथॉन स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये अनेक पदके जिंकली.

पुरुष गटात १० किलोमीटरच्या धावणे स्पर्धेत रोहन चौधरीने प्रथम क्रमांक पटकावला. महिला गटात ८ किलोमीटरच्या धावणे स्पर्धेत सुजाता मुंडेकरने पहिले स्थान प्राप्त केले. याशिवाय, दिव्या गायकवाड, तृप्ती भोईर आणि रोशनी झुंगरे यांनी अनुक्रमे चतुर्थ, सहावा आणि सातवा क्रमांक मिळवला.

१८ वर्षाखालील गटात, व्यंकटेश राठोडने द्वितीय क्रमांक मिळवला, तर मुलींच्या गटात पायल चव्हाणने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. प्रणाली म्हात्रे आणि प्रतीक्षा काशीद यांनी अनुक्रमे सातवा आणि आठवा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण एसएसटी महाविद्यालयाने त्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक प्रा राहूल अकुल आणि प्रा पुष्कर पवार यांनी मार्गदर्शन केले.


Post a Comment

0 Comments