Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी महास्वयंम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी महास्वयंम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे

-    महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड


                    ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी बेरोजगार युवक, युवती व विविध आस्थापनांनी प्राधान्य देवून महास्वयंम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे, असे प्रतिपादन महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आज केले. महापालिका भवनातील स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. या बैठकीस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नोडल ऑफिसर संजय जाधव, महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे, एमसीएचआय चे प्रतिनिधी, अनेक रुग्णालयांचे प्रतिनिधी, महापालिका क्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शासनाच्या या योजनेमध्ये शिकाऊ उमेदवार तत्वावर नोकरी देणा-या संस्थेस कुठल्याही प्रकारचे मानधन द्यावे लागणार नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची जबाबदारी घ्यावी लागणार नाही. यासाठी महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त खाजगी आस्थापना रुग्णालये, महाविद्यालये यांनी प्राधान्याने त्यांच्या कार्यालयीन आवश्यकतेनुसार शिकाऊ उमेदवार मिळण्यासाठी महास्वयंम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या बैठकीत केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना विचारलेल्या शंकाचे माहिती देवून समाधान केले.

आपल्या पुढील पिढ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, या चांगल्या हेतूने शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नोडल ऑफिसर संजय जाधव यांनी यावेळी केले. या योजनेसाठी शासकिय आस्थापनांमध्ये  मंजूर पदांच्या 5 टक्के, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना, उद्योजकांना त्यांचेकडे कार्यरत एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के आणि सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येतील. यासाठी आस्थापना, उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती अचूक दर्शविणे आवश्यक राहिल.

या पात्र उमेदवारांना (प्रशिक्षणार्थींना) त्यांच्या शैक्षणिक अहर्तेनुसार शासनातर्फे विद्यावेतन दिले जाणार आहे. 12वी पास प्रशिक्षणार्थीला 6 हजार रुपये, आयटीआय/पदवीका धारण करणा-या प्रशिक्षणार्थीला 8 हजार रुपये,  आणि पदवीधर पद्व्युत्तर प्रशिक्षणार्थीला 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल, अशीही माहिती नोडल ऑफिसर संजय जाधव यांनी उपस्थितांना दिली. महापालिकेतील प्रोग्रामर मिनल भदे यांनी महास्वयंम पोर्टलवर कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करावे, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. 


Tags

Post a Comment

0 Comments