शिर्डीला पायी जाणाऱ्या टिटवाळयातील
साई भक्तांवर काळाचा घाला
टिटवाळा येथील तिघांचा रस्ते अपघातात मृत्यू
कल्याण : टिटवाळा येथून गुरूपौर्णिमा उत्सवा निमित्ताने शिर्डीकडे पायी निघालेल्या साई आश्रय सेवा मंडळ (मांडा कोळीवाडा) पालखी सोहळ्यातील साई भक्तांना चार चाकी गाडीने सिन्नर नजीक धडक दिल्याने झालेल्या अपघातात टिटवाळ्यातील तीन साई भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे मांडा टिटवाळा परिसरात शोककळा पसरली आहे.
शनिवारी टिटवाळ्यातून शिर्डी कडे पायी जाण्यासाठी साई आश्रय सेवा मंडाळाच्या पालखीने प्रस्थान केले. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सिन्नर येथील एसएमबीटी रूग्णालया नजीकच्या रस्त्यावरून पालखी जात असता पायी चालणाऱ्या साईभक्तांना चारचाकी गाडीने धडक दिल्याने या अपघातात साई भक्त भावेश राम पाटील, रविंद्र सुरेश पाटील यांचा जागीच मुत्यू झाला तर साईराज भोईर सह सलमान हे साई भक्त गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रूग्णालयात नेले पंरतु बुधवारी साईराज भोईर याला देखील मुत्यू ने कवटाळले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गाडी चालकाचा तपास करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
रवींद्र व भावेश हे चुलत भाऊ आहेत. रवींद्र यांचे लग्न झाले असून त्याला पत्नी व दोन लहान मुली आहेत. रिक्षा चालवून रवींद्र आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटना घडून 16 तासांपेक्षा अधिक कालावधी उठून गेला मात्र अद्यापही पोलिसांनी संबंधित वाहकाला शोधलं नाही त्याच्यावर कोणतेही कारवाई केली नाही असा आरोप रवींद्र व भावेश यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments