केडीएमसी क्षेत्रात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेस महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद - आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजने अंतर्गत महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या आणि 21 ते 65 या वयोगटातील महिलांना "नारी शक्ती दूत" या ॲपद्वारे अर्ज भरायाचा आहे. हे अर्ज भरण्यासाठी 366 मतदान केंद्र उभारली जाणार असून, त्यापैकी 190 मदत केंद्रे स्थापन झाली आहेत. 28 आरोग्य केंद्रातही मतदकक्ष उभारण्यात आले असून, 277 अंगणवाड्यामधूनही लाभार्थी महिलांना अर्ज भरण्यास सहाय्य केले जात आहे. या योजनेस महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी प्रभागस्तरीय समिती नेमण्यात आली असून, या समितीवर 3 अशासकिय सदस्य व महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शासकीय सदस्य राहणार असून या प्रभागस्तरीय समितीमार्फत अर्जांची छाननी करुन पात्र महिलांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
या योजनेची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत असून महापालिका क्षेत्रातील पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा आवर्जुन लाभ घ्यावा, असेही आवाहन महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी केले. यावेळी पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे, धैर्यशील जाधव, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त स्वाती देशपांडे कुलकर्णी, प्रसाद बोरकर, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.
आगामी निवडणूकांपूर्वी इलेक्ट्रोरोल इंन्डेक्स तयार करण्यासाठी माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांनी आज महापालिका मुख्यालयास भेट देवून महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्याशी चर्चा केली. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आढावा बैठकीचे आयोजन माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
स्वातंत्र्य, निष्पक्षता, पारदर्शकता या सुत्रीवर निवडणूक होण्यासाठी नागरीकांचे, नगरसेवकांचे सल्ले घेतले जातील, अशी माहिती माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांनी दिल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले.
रेल्वे स्थानक परिसरात होणा-या वाहतुक कोंडीबाबत वाहतुक पोलीस, आरटीओचे अधिकारी यांनी वाहतुकीचे नियोजन करावे, जेणेकरुन वाहतुक कोंडीवर नियंत्रण येईल. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवरही महापालिका व पोलीस यांच्यामार्फत संयुक्तरित्या कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून वाहतुक विभागाला जड वाहनांसाठी या सप्ताहामध्ये नोटीफिकेशन काढून अंमलबजावणी करण्याबाबत सांगितले असल्याची माहिती देखील महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली.
.jpg)

Post a Comment
0 Comments