Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सरळगावसह मुरबाड हादरले.!.डॉक्टरच्या वाहनावर गोळीबार..!

 सरळगावसह मुरबाड हादरले.!.डॉक्टरच्या वाहनावर गोळीबार..!






मुरबाड- दि.५  - (प्रतिनिधी )मुरबाड - कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तसेच  बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्यासरळगाव येथे .२ जुलै२०२४ रोजी श्रीकृष्ण हॉस्पिटल यांचे डॉ. रविशंकर पाल यांच्या चार चाकी वाहनावर रात्री ३:३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून बंदुकीने वाहनाच्या काचेवर फायरिंग करण्यात आली सुदैवाने या वाहनात रात्रीच्या वेळी कोणतीही व्यक्ती नसल्याने जीवित हानी टळली असून वाहनाचे नुकसान झाले आहे रात्रीच्या सुमारास सरळगाव येथे श्रीकृष्ण हॉस्पिटलच्या बाजूला किन्हवली रोड साई अपार्टमेंटच्या ठिकाणी सदर डॉ.रविशंकर पाल यांची चार चाकी कार वाहन उभे होते त्या वाहनावरती अज्ञात इसमांकडून कशाप्रकारे वाहनावर बंदुकी द्वारे फायरिंग करण्यात आली याचे सीसीटीव्ही चित्र पोलिसांच्या ताब्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत फिर्यादी डॉ. रविशंकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमावर भा.द.क ३२४(४),१९५९/३,१९५९/२५ प्रमाणे मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला असून अशा प्रकारे वाहनावरती बंदुकीने फायरिंग करून डॉक्टर व व्यवसायकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करण्याचे अथवा खंडणी मागण्याच्या हेतूचे किंवा कोणता वैयक्तिक वाद असण्याचे कारण असू शकते का? याबद्दल मुरबाड पोलीस ठाणे पुढील तपास अतिशय तत्परतेने व कंबर कसून करत आहेत.

Post a Comment

0 Comments