लोकं पंढरीची वारी करतात आम्ही महापालिकेच्या वाऱ्या करतोय – संतप्त महिला
पाणी टंचाईमुळे ठाणकर पाडा, बेतूरकर पाडा परिसरातील नागरिक त्रस्त
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
पाणी टंचाईमुळे कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा, बेतूरकर पाडा परिसरातील नागरिक त्रस्त असून, याबाबत पालिकेला जाब विचारण्यासाठी शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या माध्यमातून येथील महिलांनी केडीएमसी मुख्यालय गाठत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांना आपल्या समस्या सांगितल्या. लोकं पंढरीची वारी करतात मात्र आम्ही महापालिकेच्या वाऱ्या करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी येथील महिलांनी दिली.
सध्या पावसाळा सुरू असून देखील कल्याण पश्चिमेतील काही भागांना पाणी टंचाई, अनियमित पाणी पुरवठा, दूषित पाणी पुरवठा अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा, बेतूरकर पाडा, शिवाजी नगर याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना गेल्या साडेचार वर्षांपासून पाणी समस्या भेडसावत असून यबाबत ते वारंवार महापालिका मुख्यालयात तक्रार घेऊन येतात, मोर्चा घेऊन येतात, आंदोलन करतात. नागरिक पालिकेत आले कि डॉन दिवस पाणी येतं. पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिति आहे.
अधिकाऱ्यांमध्ये संगनमत नसून, आयुक्तांना तीन वेळा तक्रार करून देखील वेळ देण्यात आली नाही. पावसाळ्यातच पाणी येत नसेल तर उन्हाळ्यात पाणी कसे येणार. याबाबत आमदारांना देखील तक्रार केली असून त्यांनी देखील अधिकाऱ्यांना फोन करत नागरिकांची समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत. बेतूरकर पाडा, ठाणकर पाडा, शिवाजी नगर परिसरात गेल्या ४० वर्षांपासूनच्या जुन्या पाईपलाईन असून त्या लाईन कुठे आहेत, त्यांचे वॉल्व कुठे आहेत हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे या पाईपलाईन नवीन टाकणे गरजेचे आहे. वारंवार हि मागणी पालिकेकडे केली असून, बजेट नाही असे सांगण्यात येते. खड्डे बुजविण्यासाठी तीनशे चारशे कोटी खर्च केले जातात, मात्र नागरिकांना पाणी देण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहित हि मोठी शोकांतिका असल्याची खंत माजी नगरसेवक मोहन उगले यांनी व्यक्त केली.
तर गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नसून पाणी येत नसल्याने मुलांना देखील शाळेत पाठविता येत नाही. जेव्हा पाणी येतं ते कमी दाबाने येत असल्याने मोटार लावावी लागते. यामुळे दर महिन्याला दोन हजारांचे लाईट बिल येते. लोकं पंढरपूरची वारी करत असतांना आम्हाला महापालिकेच्या वाऱ्या कराव्या लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली.
.jpg)

Post a Comment
0 Comments