बदलापूर शहरात मराठी महिला आपल्या उदरनिर्वाहासाठी हातगाडीवर व्यवसाय करत होती. तिला दोन परप्रांतीय महिला खुप त्रास देत होत्या. सदर महिला मनसेच्या मा. महिला शहरअध्यक्षा संगिता चेंदवणकर यांच्याकडे आल्या. संगिता ताईंनी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या महिलांनी काही क्षणांचा विचार न करता भर पावसात त्या मराठी महिलेला न्याय मिळवून दिला.
ब्लॅक अँड व्हाईट :बदलापूर प्रतिनिधी
बदलापुरात स्थानिक व्यावसायिक आणि परप्रांतीय व्यावासायिक असा वाद उफाळून आला आहे. बदलापुरात व्यवसाय करणाऱ्या मराठी महिलेने व्यवसाय करताना परप्रांतीय महिला व्यावसायिकांनी त्रास दिल्याचा आरोप केला.या मराठी महिला व्यावसायिक आणि परप्रांतीय महिला व्यावसायिकांच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या परप्रांतीय महिला व्यावसायिकांना मनसेने दणका दिला आहे.
बदलापूर पश्चिम भागात एक मराठी महिला अंडा भुर्जीचा व्यवसाय करते. गेल्या दोन महिन्यापासून ही मराठी महिला व्यवसाय करते. या महिलेच्या शेजारी दोन परप्रांतीय महिला अनेक दिवसांपासून त्रास देत आहेत, असा मराठी महिला व्यावसायिकेचा आरोप आहे. याबाबत मराठी महिला व्यावसायिकेने मनसेच्या कार्यालयात जाऊन संगिता चेंदवणकर यांना आपली व्यथा सांगितली.
मराठी महिला व्यावसायिकेची व्यथा ऐकल्यानंतर संगिता चेंदवणकर यांनी मनसे कार्यकर्त्यांना घेऊन परप्रांतीय महिलांच्या धंद्यावर धडक दिली. त्यांनी परप्रांतीय महिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तुमच्या बाजूला धंदा करत असलेल्या मराठी महिलेला त्रास देऊ नका, यावेळी परप्रांतीय महिलांनी संगिता चेंदवणकर यांना उडवाउडवीची उत्तर दिली. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी खळखट्याक करत परप्रांतीय महिलांना येथे धंदा करू नका, निघून जा आणि त्यांची हातगाडी उलटी करण्याचा प्रयत्न केला.
बदलापुरातील या प्रकारावर स्थानिक नागरिकांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. दरम्यान, बदलापुरात परप्रांतीय फेरीवाल्यांची मुजोरी वाढल्याचा आरोप मनसेचा आरोप आहे. तसेच त्यांच्याकडून मराठी फेरीवाल्यांना धंदा करताना प्रचंड त्रास देत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मराठी फेरीवाल्यांना व्यवसाय करताना प्रचंड त्रास देत असल्याचाही मनसेचा आरोप आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments